Posts

Showing posts with the label मराठी

मित्र आणि साहेब.

आमचा एक साहेब मित्र होता. म्हणजे आधी मित्र होता नंतर साहेब झाला. आता साहेब आहे पण मित्र नाही. त्याला मित्र समजण्यात माझी कसलीच सोय नव्हती. सोय आणि मैत्री एकत्र नांदू शकत नाहीत. बरं माझी न त्याची ब्र्यांचपण वेगवेगळी असल्यानं एकत्र बसून अभ्यासानं फाटलेल्या एकमेक्काच्या टी-या शिवायचा उसवायचा पण काही संबंध नव्हता. ह्याचा येकमेव आधार म्हणजे सिओईपी हॉस्टेलाच्या उंचच उंच भिंतीवरुन रात्री दोनतिनला उड्या टाकून, शिवाजीनगरच्या ष्टयान्डवर चहा क्रीमरोल पोहे आन गप्पा मारायला जाताना हा सगळ्या दोस्तांना पलिकडं उतरायला मदत करायचा. स्वत: नव्वद किलोचा सांड असल्यानं त्याच्या पाशवी ढुंगनाला टिरीखालून जोर देवून त्याला आधी वर चढ़वनं लै मुश्किल काम. शिवाय हा कधी ठस्सदिशी पादेल ह्याचा काय भरोसा नाही. मग मित्र आमच्या टी-यांना जोर देवून सगळ्यांना वर चढवून नंतर सर्वात शेवटी खाली उतरायचा. हे म्हणजे गांडदोस्त असल्याचं फिलिंगच जणू. मग आम्ही ष्टयांडवरच्या उपहारगृहात मुतु येस्तोवर पपा-या मारायला चालू. आरक्षण, गांधी, वोल्गा ते गंगा, बांग्लादेशी दलित मुस्लिम हिंदू, आरएसएस, बिपाशा मल्लिका सोनया, हेडगेवार ह्यारी...

पुस्तकं आणि पुस्तकं...

२३ एप्रिल - आज जागतिक पुस्तक दिन. असा काही दिन असतो हे आजच मला कळलंय! मदर्स डे, फादर्स डे, वूमन्स डे, व्ह्यालेंटाइन डे ह्यांच्या इतकं ग्ल्यामर आजच्या डे ला नाही. पण ह्या दिवसाच...

भाकरी, पूरणपोळी आणि पिझ्झा!

ह्या देशातला आगामी संघर्ष भाकरी विरुद्ध पिझ्झा असा नसून भाकरीपासून पिझ्झा पर्यंत पोहोचनारी एक पिढी आणि पूरणपोळी पासून पिझ्झा पर्यंत आधीच पोहोचलेली दूसरी समांतर पिढ...

१४ एप्रिल

तसा तू सोबतच असतोस कायम आमच्यासोबत. जन्मापासून मरणापर्यंत नाळ तुटल्यापासून माती होईपर्यंत त्याच्या आधीही आणि त्याच्या नंतरही वर्षातले तीनशे पासष्ठ दिवस बाव्वन आठवडे  ट्वेंटी फोर बाय सेव्हन… तूच दिलेली मुळाक्षरं, बाराखडी, व्यंजनं, सव्वीस अक्षरं ह्या सगळ्यांची उलथापालथ करून मी झटत राहतो तुला शब्दात पकडण्यासाठी आणि नाकाम होतो पुन्हापुन्हा. डार्विनचा उत्क्रांतिवाद, होमोइरेक्टस होमोसेपियन आइनस्टाइनचं काळाचं चौथं डायमेन्शन, हिग्जबोसोनचा कण, बिग ब्यांग, स्ट्रिंग थेरी, डार्क म्याटर डार्क एनर्जी, शेकडो संस्कृत्या, विकृत्या, प्रकृत्या, पुराणं, लेण्या लिप्या, गुहा, नगरं, महानगरं, हडप्पा मोहेंजोदडो… मी ह्यापैकी कश्शालाच मानत नाही आमच्या माणूसपणाची सुरुवात माणसातल्या माणुसकीची सुरुवात. तू दिलेल्या संविधानाची लख्ख पानं वाचत राहतो मी इथल्या अंधारात. मी मानतो एक आणि एकच मंत्र "स्वातंत्र्य समता बंधुत्व" "तू होतास म्हणून आम्ही आहोत" हा एकच प्रमेय अंतिम सत्य  मानतो मी. ह्या इथल्या सायंटिफ़िक पसा-यातून मी फक्त मागे जातो इथून केवळ सव्वाशे वर्ष आणि  प्रचंड अभि...

स्वप्नातला जब्या.

जब्या काल स्वप्नातच आला. बरं आला तो आला ते प्रचंड काळं डुक्कर घेऊनच. जब्याला म्हणालो जब्या हा काय प्रकार आहे? ते डुक्कर घेऊन असा कसा काय वर आलास? जब्या काही बोलला नाही. जब्या डुक्कर घेऊन सरळ माझ्या घरात घुसला. त्यानं माझ्या पॉश सोफ्याचं फयाब्रिक उसवून टराटरा फाडलं. फाडलेल्या फयाब्रिक चा भला मोठ्ठा दोर बनवून जब्यानं डुकराचे चारी पाय आन तोंड आवळलं. जब्याला म्हणालो जब्या बास झाला आं हा दळभद्रीपणा. जब्या पुन्हा काही बोलला नाही. डुकराला फरफटत नेऊन जब्या आता माझ्या बेडरूम मध्ये घेऊन गेला. आणि कर्लऑन च्या स्प्रिंग गादिवर डुकराला फेकून दिलं. भयंकर धगधगत्या नजरेने जब्यानं माझ्याकडे पाहिलं. जब्याची नजर असह्य होऊन मी डुकराकडे पाहिलं. त्या करकचुन आवळलेल्या डुकरात मला आता माझा चेहरा दिसाय लागला. जब्या आता किचन कड़े वळला. जब्यानं फ्रिज उघडला. आइस्ट्रे मधल्या बर्फाचे क्यूब्ज जब्यानं एकेक करून रिकाम्या पातेल्यात ओतले. मी जब्या वर ओरडलोच. जब्या जब्या अरे ते क्यूब्ज व्हिस्किच्या पेगसाठी ठेवलेयत. जब्या नुसता हसला. पण परत काही बोलला नाही. फ्रिजच्या टॉपवरची व्हिस्किची बाटली जब्यानं हातात धरली. जब्या प्लीज...

बाप आजकाल जास्त बोलत नाही

बाप आजकाल जास्त बोलत नाही. तो एकटक छताच्या पॉश पीओपी कड़े पाहत पॉश सोफ्यावर बसलाय... दुपारचे दोन वाजलेत... नुकताच कालपरवा तो साठ वर्षाचा रिटायर्ड पेन्शनर झालाय. एकोन्साठ पॉइंट नव्व्यानव चा होईपर्यंत काही वाटले नाही राव. पण आता साठ म्हटलं की एकदम पस्तिस वर्षे आपण व्होलसेल चूतिये बनलो, कुणी यडगांडयाने ही साठ ची लिमिट ठरवली, असं चिक्कार कायकाय त्याला खुपतंय, भळभळतंय, डिवचतंय, ठसठसतंय....बाप आता ना धड़ शहरी राह्यलाय ना ग्रामीण. मधल्यामधं त्याचं पॉश खेचर झालंय.  पॉश वागणं म्हणजे आपली सगळीच्या सगळी भोकं बंद करून गप्प राहाणं, पादताना सुद्धा सुरेल खोकणं...अर्थात हे तो आता कुणाशी बोलू शकत नाही. पॉश शहरात पॉश लोक्यालिटितल्या पॉश सोसायटित दहाव्या मजल्यावर पॉश फ्ल्याट मध्ये तो राहतो, तेव्हा भाषा अन वागणूक पॉशच पाहिजे असं बापाच्या सेमिपॉश बायकोने बापाला सुनावलंय... बापाचं ह्याण्डसम पोरगं सव्विस वर्षाचं झालंय. ते कधीतरी रात्री अकरा बारा नायतर दोन तीन वाजता येणारंय क्लायंट कॉल का मीटिंग च्या नावाखाली. बापाची देखनी पोरगी बावीस वर्षाची आहे लास्ट इयर ला. ती कायतरी साडेचार वाजता घरी येऊन...

मेणाची माणसं

मेणाची माणसं वितळत जातात मेणाच्याच मेणबत्त्यांसारखी. सिमिट्रिक सुरक्षित जगलेल्या आयुष्याचा टीचभर ओघळ अस्ताव्यस्त पसरवत जातात. मेणाची माणसं मोर्चेही काढतात मेणबत्त्यांचाच. एका झापेत वा-याच्या सपकन विझूनहि जातात. मेणाची माणसं चेतवू शकत नाहीत छ्टाक्भर प्रकाशही. त्यांच्यातल्या वाती केव्हाच्याच मोडलेल्या असतात. फारफारतर मेणाची माणसं जमंल तसं चिकटून राहतात एकाचजागी. कोणीतरी बुड उचकटे पर्यंत गपगुमान पिघळत राहतात आपल्याच सोयीस्कर स्थितप्रद्न्य  मध्यमवर्गीय चिरंतन कोषात.

नाव नसलेले काही लेख - २.

तसं पाहिलं तर आताशा आपण जे कायपण लिहित असतो ते आल्मोस्ट  कुणी घंटा वाचत नाही. तरीही हि लिहिण्याची अगम्य खाज का काय कायमची शमत नाही. अधूनमधून उफाळोन येतेच. थाड थाड करत क्यालेंडरचि पानं उडत जातात. वयाचं नामोनिशान अजून दिसत नसलं तरी आपण झिजत असतोच प्रत्येक क्षणाला. कुणाला ते झिजणं मनासारखं वाटतं. तर कुणाला आपण झिजतोय ह्याची काहीच लेणदेण नसते. तर कुणी आपल्यासारखे चुतिये आपण का, कशासाठी झिजतोय ह्याचं विच्छेदन करण्यात अक्षरांची होळी पेटवतात... कोण्या एका भुक्कड संध्याकाळी आत्ममग्न होत पाहिलेली स्वप्ने - उदाहरणार्थ चळवळ, लेखन, राजकारण, प्रशासन, इतिहास, कविता  इत्यादी इत्यादी फालतू शब्दबंबाळ जांगडगुत्ता नुसता… ह्याच्यापासून आपण मैलो दूर आलोय आता. प्राथमिकता बदलून गेल्यात. किंबहुना ज्या गोष्टी येडझव्या बुर्झ्वा वाटायच्या त्याच गोष्टीत जगण्याची प्राधान्यक्रमता ठरू लागलीय. शेवटी आपणही ग्लोबलायझ होता होता येड्यात निघालो च्यामायला. किंवा असंही असू शकतं कि भुक्कड संध्याकाळी पाहिलेली स्वप्ने खरोखरच बिनडोक होती. हिरोइझम का फ्यांटसिझम चा नाद होता बहुतेक. जवळपास ते सगळं संपल्या सारखं वाटू लाग...

नाव नसलेले काही लेख - १. ५

आयुष्यातील गेली तीनेक वर्षे मानसिक दृष्ट्या फारच अस्वस्थ, ओढाताणीची, अजीर्ण  जावू लागली आहेत. मनात प्रचंड खदखद साचू लागली आहे. नेमकं काय होतंय हे सांगण्याच्या पलीकडे गेल्यासारखं वाटू लागलंय. शब्दांची कधी नव्हे ते कमतरता भासू लागली आहे. सगळा खटाटोप अनाकलनीय वाटू लागला आहे. एका झटक्यात सगळी भेंचोत नाती तोडून द्यावीत आणि लांब कुठे तरी निघून जावे असे वाटू लागले आहे. ब-याच वेळेस आपल्या सर्वांगाची वाफ झाली  तर किती बरे होईल असे वाटू लागलेय. पुस्तकं वाचायला घेतली तर चारेक पानं वाचूनच गरगरायल्या सारखं होतं आजकाल. ज्या लोकांना "हरामखोर" हि पदवी लावून मेंदूतून format केलं तीच लोकं  व्हायरस सारखी मनात कचकचून आठवू लागतायत. काही लोकांनीही आपल्याला त्यांच्या आयुष्यातून अक्षरश: format केलं, हाकलवून दिलं नकळत अलगद … त्यांनाही आपण असेच पछाडत असू का? कि ही माझीच स्वयंभू खाज आहे परत परत तेच तेच चेहरे आठवण्याची? असे एक ना हजार फालतू छिनाल प्रश्नं… रिकाम्या धरणासारखे, वळवळना-या गांडूळा सारखे, पालीच्या तुटलेल्या शेपटी सारखे, काय काय अन काय काय!!! जे काही वाटतंय ते व्यवस्थित शब्दांत सुद्धा सा...

नाव नसलेले काही लेख - १

मी अत्यंत भिकारचोट झालो आहे असे मला आजकाल वाटू लागले आहे. म्हणजे बक्कळ पैसे ब्यांकेत आणि खिशात असूनही मी डेंजर भिकारी झालोय असं वाटतंय. हे भिकारपण बहुतेक आर्थिक सोडून बाकी सगळ्या ज्ञात अज्ञात प्रकारचं असावं. सामाजिक, मानसिक, शारीरिक, नैतिक, तार्किक, बौद्धिक, पारंपारिक, लौकिक, वैचारिक  आणि काय काय कुणास ठावूक! कित्येक - "इक" शब्दांत असणा-या व्याख्यांचं हे भिकारपण माझ्यापाशी गेल्या चारेक वर्षात बक्कळ जमा झालंय. पैसे सोडून बाकी काहीच आपले जवळचे "नसण्याची" ही जीवघेणी श्रीमंती मला चिक्कार वेळेस नकोनकोशी वाटते. आणि खोटं कशाला बोला - ब-याच वेळेस हवीहवीशी देखील वाटते. मनामध्ये सतत उल्टेपालटे विचार येतात. म्हणजे काहिच्याकाहि. उदाहरणार्थ - आत्ता ह्या क्षणाला मी मेलो तर काय होईल? कुणाला आणि किती काय फरक पडेल? मी लांबलेल्या, आधी असलेल्या आणि आता नसलेल्या आणि त्यातल्या त्यात  आता जवळ असणा-या मित्रांना शेवटी काय बोलेन. फेसबुक वापरेन कि whatsapp वापरेन. मी कितीही सिरीयस होऊन आपले शेवटचे  मनोगत त्यांना व्यक्त केले तर ते नुसता "हम्म"  असा हरामखोर ...

बाज

धूळभरल्या अक्षरांची पापणी उघडली जाते असह्य पोरकेपणाने... आणि सरकत जातो डोळाभर रस्त्यावरून तुझ्या आठवणींचा बेहद्द लमाण तांडा. मी तुला रूतेनच निमुळत्या पायांच्या फिक्या चंद्ररंगी जोडव्यातून, मी तुझ्यात विखरेनच अंगोपांगी आरश्यातून स्पर्शाळत्या प्रतिबिंबातून. तू फक्त कविता हो माझ्या अक्षरांपलिकडची दुःखाचा लमाणी बाज पांघरून.

तो दबून जातो कचेरीतल्या बेदम फायलींखाली...

तो दबून जातो कचेरीतल्या बेदम फायलींखाली... ती पोपडे उडालेल्या भिंतीवरून खरखरीतपणे फिरवत राहते खडबडीत झालेल्या हातांवरच्या रेषाच रेषा... तो खातो बॉसच्या शिव्याच शिव्या सवयीप्रमाणे आणि हसतो निर्लज्जासारखा वैतागत तोंडावर पट्टी बांधून... ती चढते उतरते चोवीस पाय-या पुन्हापुन्हा पाठीत सणक भरेस्तोवर कॉर्पोरेशनच्या गढूळ पाण्यासाठी झुंबडगर्दीत नळावरच्या आयाबहिणींशी पंगा घेत घेत.. तो उघडतो थंडगार झालेला डबा घरघरत्या मळकट फॅनखाली भरदुपारी गिळतो दोन थंडच थंड घास, मिसेस शर्माच्या वेणीतल्या फुलामागे दिसणा-या खिडकीच्या कळकटलेल्या काचफुटक्या भागातून मॅकडोनल्डच्या पोस्टरकडे पाहत पाहत.. ती मनातल्या मनात उतरवून घेते खरखरणा-या टिव्हीवरची भन्नाट रेसिपी आणि वाण्याच्या दुकानात जाऊन काहीच न घेता परत फिरते महागाईने मुस्काडात मारल्यागत... तो बिचकत बिचकत पोहोचतो घरी गर्दीतल्या एखाद्या अतिक्षुद्र जंतूसारखा ती उघडते पोखरलेलं दार आणि उसवते फाटलेल्या ओठांवरचं रोजचंच हसू तो काहीही न बोलता पडून् राहतो शांतच शांत , कोणत्याही क्षणी डोक्यावर पडू शकणा-या झिंगलेल्या फॅन खाली आणि हरवून जा...

अफझलखानी प्रवृत्ति आणि त्यांचे हितचिंतक

मिरज येथे गणपति उत्सवाच्या शेवटच्या काही दिवसात तणावाची स्थिति उत्पन्न होउन त्याचे रूपांतर दंगलीत झाले. त्याचे लोण पूर्ण पश्चिम महाराष्ट्रभर पसरले. सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, सातारा,सोलापूर इत्यादि शहरे आणि ग्रामीण भागामध्ये हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. अजुनही वातावरण पूर्णतः शांत झालेले नसून काही ठिकाणी संचारबंदी लागू आहे. या सर्व गोष्टींना कारण काय घडले? मिरज शहरामध्ये एका सार्वजनिक गणेश मंडळाने अफझलखान वधाची कमान उभारली. ती कमान उभी करण्यास आधी पोलिस व जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली होती, परंतु नंतर ती परवानगी देण्यात आली. त्यानंतर, अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी मिरजेत मुस्लिम जमावाने निदर्शने केली. या गोष्टीला कारण ती कमान ठरली. त्या जमावाला उत्तर म्हणुन हिंदू जमाव एकत्रित झाला आणि दगडफेक सुरु झाली. पोलिसांनी लाठीमार सुरु केला. पळून जाता जाता त्या मुस्लिम जमावातिल काही माथेफिरूंनी एका गणेश मंडळाच्या गणेशमूर्तीवर दगडफेक करून मूर्तीची विटंबना केली. त्या नंतर भडकलेल्या दंगलीत अनेक गणेशमूर्तिंची तोडफोड आणि विटंबना करण्यात आली. या बातम्या वेगाने पसरल्या आणि त्याचे रूपा...

'एकादशीच्या घरी शिवरात्र'

जसवतसिंगांची हकालपट्टी झालीच शेवटी. हे तसे तर फार आधीपासूनच ठरले होते. लोकसभा निवडणूकीतल्या मानहानीजनक पराभवानंतर बहुतांश भाजप नेत्यांचे डोके फिरल्यागतच झाले होते. जसवंतसिंगानीही त्याच न्यायाने वागत जराश्या वेगळ्या पद्धतीने त्यावर शिक्कामोर्तब केले इतकेच. तसे पाहिले तर लोकसभा निवडणूकांनंतर पक्षश्रेष्ठींना पत्रे पाठवून त्यांनी भाजपाच्या चिंतनशीलतेविषयी, पराभवाच्या जबाबदारीविषयी जेव्हा प्रश्ने उपस्थित केली तेव्हाच कमळावरचे भुंगे चिडले. हकालपट्टीच्या निर्णय म्हणजे सगळ्या भुंग्यांनी एका फरफटलेल्या दुस-या भुंग्याला चावा घेतला असेच म्हणावयास हवे! पुस्तकांच्या रूपाने प्रसिद्धी स्वतःकडे खेचून घेणे जसवंतसिंघांना काही नवीन नाही. ए कॉल टू हॉनरःइन सर्विस ऑफ इमर्जंट इंडिया ह्या पुस्तकातही त्यांनी वादग्रस्त विधाने खळबळ उडवून दिलीच होती. हातात सत्ता नसली म्हणजे लेखणी सुद्धा फरफटते हयाचेच हे द्योतक आहे. जिना आणि फाळणीचा चघळून चघळूनही न संपलेला प्रश्न पुन्हा उपस्थित करून जसवंतसिंघांनी नेमके काय साधले कुणास ठावूक? त्यांच्या ह्या असल्या आशाळभूत वर्तनावर ताशेरे ओढणे साहजिकच होते. पण एक बाब इथे लक्षात घ्य...

कोणी कुणाचा नातलग लागू नये

कोणी कुणाचा नातलग लागू नये, तरीही प्रापंचिक अपघातात फ्रॅक्चर झालेल्या खांद्यावरून जमेल तितक्यांच्या वजनदार तिरडयांना शेवटचे गावदर्शन करवून सुखरूप पोहोचवून यावे सरकारी स्मशानात. कोणी आपल्या एकटेपणाचा सबळ पुरावा मागीतलाच तर लिहून दाखवाव्यात त्याला अश्या कविता स्वत:च्या सहीनिशी झोकदार. किंवा वर्षातून एकदा एकटेच देहू,आळंदी,पंढरपूर ची करावी आत्मशोधार्थ वारी. तरीही त्यांतल्या त्यांत चार बळकट खांद्यांची सांधेदुखी जिद्दीने पोसावी - आपल्या एकांत-मढ्याचा भार बळजबरीने सोसणारी.

"वरातीमागून घोडे"

"वरातीमागून घोडे" ह्या म्हणीचा प्रत्यय पुन्हा गेल्या आठवड्याभरात सगळयांनाच आला असेल. देशात आणि विशेषतः पुण्यात स्वाईन फ्लू चे जे थैमान चालू आहे त्याने सरकार जनतेच्या आरोग्याविषयी किती संवेदनशील आहे हेच दिसून येते. कोणी म्हणेल सरसकट नेहमीच सरकारी यंत्रणेवर खापर फोडून आपण मोकळे होते. पण हे तसे नाही. लोकांनी कुणाकडे बघायचे? का नशिबाला दोष देत डोके फोडत बसायचे? ज्या वेळेस ही साथ अमेरिका, मेक्सिको मध्ये सक्रिय होती तेव्हाच तातडीने काही उपाय योजले असते तर आज ही भित भित जगायची वेळ आलीच नसती. पण आम्ही, आमचे सगळे चॅनेल्स राखी सावंतचे लगीन होईल् का, कोणासोबत होईल ह्यातच आपले सगळे कव्हरेज खर्ची घालत होते. "जनजागॄती"ची प्रक्रिया ही काही एकदोन दिवसांची नसते. तिला ठोस कार्यक्रम असावा लागतो हे ना आमच्या राज्यकर्त्यांना कधी कळले ना जनतेने कधी स्वतःहून त्यात उत्साह दाखविला. आज देशाच्या महत्वाच्या एकामागून एक शहरात स्वाईन फ्लू चे हातपाय पसरत चालले आहेत. अपुरी यंत्रणा, प्रचंड लोकसंख्या, औषधांचा तुटवडा, धास्तावलेली जनता ह्यामुळे हे चित्र अत्यंत विदारक झाले आहे. शाळा बंद ठेवाव्यात की ...

ह्या भरघोस पानगळीच्या मोसमात…

ह्या भरघोस पानगळीच्या मोसमात माझ्यातल्या चौथ्या डायमेन्शनपर्यंत पेटलेला तुझा अमलताशी स्पर्श… किती छळशील अजुन…?? अद्याप माझ्या हद्दीत आला नाहीये आयुष्याच्या नाक्य...

नकळत

जास्त काही मागितलं नव्हतं तुझ्या जवळ… अगदी जमल्यासच (आणि लक्षात राहिलंच तर) फक्त तुझ्या श्वासांची एक पाकळी पाठवून दे माझ्याकडे असं म्हणालो होतो माझ्याही नकळत. माझं हे ‘नकळत’पणच तू इतकं मनावर घेतलंस की, समर्पणाची देठं लावलेल्या लक्षावधी फुलांची वादळं घेऊन आलीस माझ्या देहाच्या देशात! जास्त काही मागितलं नव्हतं तुझ्या जवळ…

मुक्ती-२

मरणोत्तर मुक्तीच्या माझ्या घरापर्यंत चालत आलेल्या ऑफर्स मी लावतोय धुडकावून. जगण्याची बंधनं समजून घेतानाच्या होणार्‍या दमछाकीला आता कुठे उकलताहेत माझ्या श्वासांच्या गाठी. स्वातंत्र्याच्या गर्भातली ऊब मी नव्याने अनुभवतोय पूर्वीपेक्षा जास्ती प्रेमाने. प्रिय वास्तवा, माझ्या शापित कवितेला लाभू दे नितांत सुंदर उ:शाप अश्वत्थाम्याच्या चिरंतन जखमेचा.

मुक्ती-१

हल्ली, शब्दांच्या पिंडाला शिवता शिवत नाहीत अर्थाचे कावळे आणि भाषेच्या श्राद्धवजा पुण्यस्मरणाची तयारी करून कवितेचा मुक्तीसाठीचा धिंगाणा विखुरतोय जगण्याच्या स्मशानभर!