Posts

Showing posts from May, 2015

स्ट्रॉबेरी

जहाल लालभडक मिरची रंगाची लिपस्टिक लावून, आयलायनर, मस्करा, फॉउंडेशनचा मेट्रोमास्क धारण करुन, बारीक पट्टीचा ओपन ब्याक स्लीवलेस घालून गोरया नितळ स्लिम दंडावरचा चिकना ट्याटू मिरवत कोमट कोडगी म्याड़म पीव्वर हॉट झाली. फिगर उठून भेदक दिसावी म्हणून सिल्कची साडी सगळ्या कर्व्हज वरुन अजून चोपुन चापुन व्यवस्थित केली. नाऊ इट्स लुकिंग प्योर हॉट या! हाय हिल्स घालता घालता मुद्दाम ज्यास्त वाकून तिने सोफ्यावर रेळलेल्या यंग डायन्यामिक हब्बीला झापले "ह्या अश्या चिप अवतारात येणारेस तू? तुला कळतंय का हन्नी व्हेर आर वि गोइंग? ती परवाची कॉस्टली शॉपिंग काय उगाच केलीय का?श्शी गावठी तो गावठीच." तिच्या रिकाम्या खोल गळ्यावरच्या कातील तिळाकड़े निरखून बघत वैतागत हब्बी आत गेला. क्रेडिट कार्डावर घेतलेला शॉपर्स स्टॉप मधला टी शर्ट आणि जीन्स घातली. बायसेप्स दिसाव्यात म्हणून टीशर्टच्या बाह्या ज़रा वर ताणल्या. एक्स डिओ मारून झटपट रेड़ी झाला. "हम्म. आता ओकेय. बट स्टील नॉट लाइक सलमान हां". "यू टू नॉट लाइक ऐश हां." एकमेकांची खेचत दोघे सोसायटीच्या खाली आले. इन्नोवा रेडिच होती. "घराला घरपन देणारी

सोलापूर माढा पुणे...

सोलापूर, माढा आणि पुणे ह्या तीन ठिकाणातच माझ्या आत्तापर्यंतच्या तीस वर्षीय आयुष्यातला ९९.१७% टक्के वेळ गेलेला आहे. ह्या तिन्ही ठिकाणांचा माझ्या आयुष्यावर भयंकर प्रभाव आहे. सोलापुरनं मला वरकरणी कितीही रिकामचोट भिकारचोट भकास धूळग्रस्त दुष्काळी वाटू शकना-या आयुष्यात सॉल्लीड आनंदानं कसं जगायचं हे शिकवलं. त्यातल्या त्यात माझं घर हद्दवाढ भागातलं असल्यानं मी शहरात राहतोय का खेड्यात ह्याचं बेमालूम कन्फ्यूजन करून मला नेहमीच औकातीत ठेवलं. मुतायची भिती वाटावी असा उन्हाळा कश्याला म्हणतात, थोबाडाला भेगा पाडणारी धुळीची बोचरी निब्बर थंडी कशी असते, नुसती आभाळभर उंडारनारी ढगंच्या ढगं कित्तीही जीव खाऊन गांड आवळून डरकाळली तरी झ्याट पाऊस पडत नसतो हे सर्व सोलापूरनंच मला दाखवलं! आज होईल उद्द्या होईल म्हणत म्हणत वर्षानुवर्षे उखडून ठेवलेल्या दगडी रस्त्यांवर नुसती साइडला पोतंभर खड़ी आन एक पिंप डांबर दिसलं तरी खुश होणारी लोकं, किमान आठदहा तास लोडशेडिंगच्या फटक्यातून कधीमधी चुकून अर्धाएखाद तास आधीच लाइट आली तर झटका बसणारी खुश लोकं, एखादा दिवस नळाला जास्त प्रेशरनं पाणी आलं की जमतील तितकी एक्सट्रा हंडा कळश्या पाते