Posts

Showing posts from August, 2008

Indian Independance Day

It was this day 61 years ago that our great nation was liberated from centuries of bondage, slavery and alien occupation. Today is indeed a national festival. It is a festival of unbounded joy and pride. It is an auspicious day of igniting our conscience with pristine national thought. We are combating with great evils such as terrorism, casteism, treason, unemployment, corruption, separatism, external aggressions, population explosion, crimes against women, foeticide and many more. It is a struggle of life and death. A sense of profound gloom and helplessness has cast its dark shadow over our nation. But today is the day which enables us to shrug off this distress and to derive strength from the bliss of freedom. Today is also the day of mourning for the territorial integrity of our nation. Such times which produce an inseparable unity of happiness and sorrow seldom come in the history of mankind. It was 61 years ago, on this day that our nation was brutally vivisected. The land in wh

भारतीय स्वातंत्र्यदिन

६१ वर्षांपूर्वी याच दिवशी आपले महान राष्ट्र शेकडो वर्षांच्या दास्याच्या श्रुंखलांतुन मुक्त झाले. आजचा दिवस हा खरोखरी राष्ट्रीय सण आहे. मुक्त आनंद आणि अभिमानाचा आहे. मनामनामध्ये मंगल राष्ट्रीय भावना जागृत करण्याचा आहे. आज आपला देश दहशतवाद, जातीय तेढ, बेकारी, देशद्रोह, महागाई, भ्रष्टाचार, फुटिरतावाद, बाह्य आक्रमणे, लोकसंख्यावाढ, स्त्रियांवर अत्याचार, भ्रूणहत्या आणि अशाच अनेक जीवघेण्या रोगांशी संघर्ष करतो आहे. हा जीवन मरणाचा संघर्ष आहे या बद्दल शंकाच नाही. एका प्रचंड अश्या सार्वजनिक नैराश्याने आपल्या राष्ट्रीय जीवनावर कृष्णछाया टाकलेली आहे. पण आजचा दिवस हा या सर्व नैराश्याला बाजूला ठेवून स्वातंत्र्याच्या मुक्त आनंदतुन या सर्व समस्यांशी लढा उभारण्याची शक्ति देणारा आहे. आजचा दिवस आपल्या राष्ट्राच्या भौगोलिक एकसंधतेच्या पुण्यस्मरणाचा सुद्धा आहे. जगाच्या इतिहासात आनंद आणि दुःख यांचे इतके एकजीव मिश्रण असणारे क्षण क्वचितच येतात. ६१ वर्षांपूर्वी याच दिवशी आपल्या राष्ट्राचे क्रूरतेने तुकडे करण्यात आले. जिथे आपल्या पूर्वजांनी आपल्या राष्ट्राचा आणि पर्यायाने एका श्रेष्ठ मानवी अस्तित्वाचा पाया रचला

पाढा

आईवडीलभाऊबहीणमित्रमैत्रिणीकलिग्जबॉस हे तर अपरीहार्यच त्याशिवायही माझ्यात आणि जगात अंतर राहू नये म्हणून सकाळी दार खटखटवणारा पेपरबॉय किराणा मालाच्या दुकानातील मारवाडी माझी किंवा माझ्यांमुळे गोची होऊ नये वाहतूकीची म्हणून ट्रॅफिक पोलीस इत्यादी इत्यादी सगळेजण ज्ञात आणि अज्ञात... ह्यांना वजा करून जो काही उरतो मी तो म्हणजे शून्याच्या आसपास डेसिमल्सच्या अनंत चेनसारखा पूर्णत्वासाठी झगडणारा... एक छाटछूट अवशेष... ज्याला तुम्ही 'आयुष्य' म्हणता आणि ते मी ही जगून घेतो शून्याचा पाढा म्हणत वारंवार!!!