Posts

Showing posts from May, 2009

भारतीय राष्ट्रवादाचा पराभव

लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रवादी शक्तींचा अभूतपूर्व पराभव झाला. धक्का फार मोठा आहे. धक्का फक्त या पराभवाचा नाही. मूळ विश्वास, आस्था आणि श्रद्धांचा आहे. आम्ही ज्या गोष्टींवर मनापासून श्रद्धा ठेवतो, ज्या काही गोष्टी आमच्या जीवनातील मूलभूत सत्ये आहेत, मातृभूमिचे एक राष्ट्र हे स्वरुप आम्ही मनी बाळगतो, ते सर्व खरोखरीच अस्तित्वात आहे का? त्याला वास्तवामध्ये काही आधार आहे का? का ते सर्व फक्त आमच्या स्वप्नसृष्टितच आहे, आमच्या पुरतेच सत्य आहे ? Do our beliefs have any relevance? मुळापासून विचार करावा लागेल. RSS आणि संघ परिवार हे काही सर्वगुणसम्पन्न मर्यादा पुरुषोत्तमांचे समूह नाहीत. कलियुगात कोणीच तसे नाही. पण आमच्या बहुदा कल्पनाविश्वातच असलेल्या राष्ट्रीय सत्वाचे - वास्तवात असणा-या शक्तिंमध्ये - सर्वात जवळचे असे वारसदार आणि संरक्षक नक्कीच आहेत. They are the closest approximation of the national essence of India of our time. म्हणुन त्यांच्या पराभवाने मन विषण्ण होते. एक तर हे आहे किंवा आम्ही मानतो ते राष्ट्रीय सत्व नाहीच. कधीच नव्हते. किंवा पूर्वी कधीकाळी असेलही पण आता ते नाही आणि