Posts

Showing posts from April, 2015

मित्र आणि साहेब.

आमचा एक साहेब मित्र होता. म्हणजे आधी मित्र होता नंतर साहेब झाला. आता साहेब आहे पण मित्र नाही. त्याला मित्र समजण्यात माझी कसलीच सोय नव्हती. सोय आणि मैत्री एकत्र नांदू शकत नाहीत. बरं माझी न त्याची ब्र्यांचपण वेगवेगळी असल्यानं एकत्र बसून अभ्यासानं फाटलेल्या एकमेक्काच्या टी-या शिवायचा उसवायचा पण काही संबंध नव्हता. ह्याचा येकमेव आधार म्हणजे सिओईपी हॉस्टेलाच्या उंचच उंच भिंतीवरुन रात्री दोनतिनला उड्या टाकून, शिवाजीनगरच्या ष्टयान्डवर चहा क्रीमरोल पोहे आन गप्पा मारायला जाताना हा सगळ्या दोस्तांना पलिकडं उतरायला मदत करायचा. स्वत: नव्वद किलोचा सांड असल्यानं त्याच्या पाशवी ढुंगनाला टिरीखालून जोर देवून त्याला आधी वर चढ़वनं लै मुश्किल काम. शिवाय हा कधी ठस्सदिशी पादेल ह्याचा काय भरोसा नाही. मग मित्र आमच्या टी-यांना जोर देवून सगळ्यांना वर चढवून नंतर सर्वात शेवटी खाली उतरायचा. हे म्हणजे गांडदोस्त असल्याचं फिलिंगच जणू. मग आम्ही ष्टयांडवरच्या उपहारगृहात मुतु येस्तोवर पपा-या मारायला चालू. आरक्षण, गांधी, वोल्गा ते गंगा, बांग्लादेशी दलित मुस्लिम हिंदू, आरएसएस, बिपाशा मल्लिका सोनया, हेडगेवार ह्यारी पॉटर कां

पुस्तकं आणि पुस्तकं...

२३ एप्रिल - आज जागतिक पुस्तक दिन. असा काही दिन असतो हे आजच मला कळलंय! मदर्स डे, फादर्स डे, वूमन्स डे, व्ह्यालेंटाइन डे ह्यांच्या इतकं ग्ल्यामर आजच्या डे ला नाही. पण ह्या दिवसाच्या निमित्ताने मी आजपर्यंत काय काय वाचलं ह्याचा सहज विचार केला तर मी अद्यापही एकदमच छटाक वाचक आहे ह्याची जाणीव झाली. माझ्या वाचनाची - ज्याला आपण अवांतर म्हणतो ते वाचन, सुरुवात कधी झाली हे सांगणे तसे अवघड आहे. पंधराव्या वर्षापर्यंत तरी मी चांदोबा, विक्रम वेताळ, गृहशोभिका(होय! हे मी वाचायचो) आणि  सोळाव्या सतराव्या वर्षी मी मा.म. देशमुख ह्यांची काही छोटी छोटी सनसनाटी पुस्तके वाचायचो. ही पुस्तके सनसनाटी आहेत हे मला तेव्हा कळायचे नाही. तरी गृहशोभिकाच मी जास्त वाचायचो. नववी दहावीला असताना मधल्या सुट्टीत जबर 'दूरदृष्टि' असणा-या काही महान मित्रांच्या उपकाराने मी हैदोस, डेबोनियर, प्यासी चुड़ैल, मदमस्त जवानी ही पुस्तकं पण चवीनं वाचली आहेत. इंजिनियरिंगला आल्यावर हैदोस च्या पुढच्या आवृत्त्या हॉस्टेलात ढिगाने पडलेल्या असायच्या. एकदोनदा त्याचे सामूहिक वाचनाचे कार्यक्रम हॉस्टेलात झालेले. पुढे पुढे तेही बोर झाले. हैदोस वा

भाकरी, पूरणपोळी आणि पिझ्झा!

ह्या देशातला आगामी संघर्ष भाकरी विरुद्ध पिझ्झा असा नसून भाकरीपासून पिझ्झा पर्यंत पोहोचनारी एक पिढी आणि पूरणपोळी पासून पिझ्झा पर्यंत आधीच पोहोचलेली दूसरी समांतर पिढी ह्यांच्यातला आहे. पूरणपोळी पासून पिझ्झा पर्यंत सहज पोचू शकलेले बहाद्दर संस्कृतीची थूकरट शिट्टी वाजवत भाकरी टू पिझ्झा वाल्यांना शिव्या घालण्याचा राजरोस उपक्रम इथे करतात. भाकरी टू पिझ्झा वाले पण पूरणपोळीवाल्यांची आयभैन काढत मागे न हटण्याचा निर्धार करून शडडू ठोकतात. पुरणपोळी वाले पूरणपोळी किती टेस्टी अन कल्चरल आहे ह्याची खवूट पादरी धून वाजवतात. इतकंच नाही तर समग्र पिझ्झाखाऊ समाजच कशी देशाची गांड मारतोय ह्याचे नैतिक लसिकरण करू पाहतात आणि हळूच एखादं चीजबर्स्ट पिझ्झाचं टॉपिंग स्वत: गटकवतात! इथली संस्कृती, परंपरा, अध्यात्म कसं ग्रेट आहे हे तुपाळ भाषेत सांगत पूरणपोळी वाले आधुनिकतेचे सर्व फायदे मस्त एनक्याश करतात. भाकरी टू पिझ्झा प्रवास करणा-याला परंपरेसोबत जगायचे उदात्त ग्यान द्यायचा प्रयत्न करतात. लंगोटीबाज स्वामी बुवाबाबांची यथेच्छ पूजा घालतात. स्वत: मात्र जॉकी घालतात. अर्थात जॉकी घातली म्हणून ह्यांची गुलाबी हिप्पोक्रेट ढुंगणं सु

१४ एप्रिल

तसा तू सोबतच असतोस कायम आमच्यासोबत. जन्मापासून मरणापर्यंत नाळ तुटल्यापासून माती होईपर्यंत त्याच्या आधीही आणि त्याच्या नंतरही वर्षातले तीनशे पासष्ठ दिवस बाव्वन आठवडे  ट्वेंटी फोर बाय सेव्हन… तूच दिलेली मुळाक्षरं, बाराखडी, व्यंजनं, सव्वीस अक्षरं ह्या सगळ्यांची उलथापालथ करून मी झटत राहतो तुला शब्दात पकडण्यासाठी आणि नाकाम होतो पुन्हापुन्हा. डार्विनचा उत्क्रांतिवाद, होमोइरेक्टस होमोसेपियन आइनस्टाइनचं काळाचं चौथं डायमेन्शन, हिग्जबोसोनचा कण, बिग ब्यांग, स्ट्रिंग थेरी, डार्क म्याटर डार्क एनर्जी, शेकडो संस्कृत्या, विकृत्या, प्रकृत्या, पुराणं, लेण्या लिप्या, गुहा, नगरं, महानगरं, हडप्पा मोहेंजोदडो… मी ह्यापैकी कश्शालाच मानत नाही आमच्या माणूसपणाची सुरुवात माणसातल्या माणुसकीची सुरुवात. तू दिलेल्या संविधानाची लख्ख पानं वाचत राहतो मी इथल्या अंधारात. मी मानतो एक आणि एकच मंत्र "स्वातंत्र्य समता बंधुत्व" "तू होतास म्हणून आम्ही आहोत" हा एकच प्रमेय अंतिम सत्य  मानतो मी. ह्या इथल्या सायंटिफ़िक पसा-यातून मी फक्त मागे जातो इथून केवळ सव्वाशे वर्ष आणि  प्रचंड अभिमाना

स्वप्नातला जब्या.

जब्या काल स्वप्नातच आला. बरं आला तो आला ते प्रचंड काळं डुक्कर घेऊनच. जब्याला म्हणालो जब्या हा काय प्रकार आहे? ते डुक्कर घेऊन असा कसा काय वर आलास? जब्या काही बोलला नाही. जब्या डुक्कर घेऊन सरळ माझ्या घरात घुसला. त्यानं माझ्या पॉश सोफ्याचं फयाब्रिक उसवून टराटरा फाडलं. फाडलेल्या फयाब्रिक चा भला मोठ्ठा दोर बनवून जब्यानं डुकराचे चारी पाय आन तोंड आवळलं. जब्याला म्हणालो जब्या बास झाला आं हा दळभद्रीपणा. जब्या पुन्हा काही बोलला नाही. डुकराला फरफटत नेऊन जब्या आता माझ्या बेडरूम मध्ये घेऊन गेला. आणि कर्लऑन च्या स्प्रिंग गादिवर डुकराला फेकून दिलं. भयंकर धगधगत्या नजरेने जब्यानं माझ्याकडे पाहिलं. जब्याची नजर असह्य होऊन मी डुकराकडे पाहिलं. त्या करकचुन आवळलेल्या डुकरात मला आता माझा चेहरा दिसाय लागला. जब्या आता किचन कड़े वळला. जब्यानं फ्रिज उघडला. आइस्ट्रे मधल्या बर्फाचे क्यूब्ज जब्यानं एकेक करून रिकाम्या पातेल्यात ओतले. मी जब्या वर ओरडलोच. जब्या जब्या अरे ते क्यूब्ज व्हिस्किच्या पेगसाठी ठेवलेयत. जब्या नुसता हसला. पण परत काही बोलला नाही. फ्रिजच्या टॉपवरची व्हिस्किची बाटली जब्यानं हातात धरली. जब्या प्लीज

बाप आजकाल जास्त बोलत नाही

बाप आजकाल जास्त बोलत नाही. तो एकटक छताच्या पॉश पीओपी कड़े पाहत पॉश सोफ्यावर बसलाय... दुपारचे दोन वाजलेत... नुकताच कालपरवा तो साठ वर्षाचा रिटायर्ड पेन्शनर झालाय. एकोन्साठ पॉइंट नव्व्यानव चा होईपर्यंत काही वाटले नाही राव. पण आता साठ म्हटलं की एकदम पस्तिस वर्षे आपण व्होलसेल चूतिये बनलो, कुणी यडगांडयाने ही साठ ची लिमिट ठरवली, असं चिक्कार कायकाय त्याला खुपतंय, भळभळतंय, डिवचतंय, ठसठसतंय....बाप आता ना धड़ शहरी राह्यलाय ना ग्रामीण. मधल्यामधं त्याचं पॉश खेचर झालंय.  पॉश वागणं म्हणजे आपली सगळीच्या सगळी भोकं बंद करून गप्प राहाणं, पादताना सुद्धा सुरेल खोकणं...अर्थात हे तो आता कुणाशी बोलू शकत नाही. पॉश शहरात पॉश लोक्यालिटितल्या पॉश सोसायटित दहाव्या मजल्यावर पॉश फ्ल्याट मध्ये तो राहतो, तेव्हा भाषा अन वागणूक पॉशच पाहिजे असं बापाच्या सेमिपॉश बायकोने बापाला सुनावलंय... बापाचं ह्याण्डसम पोरगं सव्विस वर्षाचं झालंय. ते कधीतरी रात्री अकरा बारा नायतर दोन तीन वाजता येणारंय क्लायंट कॉल का मीटिंग च्या नावाखाली. बापाची देखनी पोरगी बावीस वर्षाची आहे लास्ट इयर ला. ती कायतरी साडेचार वाजता घरी येऊन पाच ला एरोबिक