भाकरी, पूरणपोळी आणि पिझ्झा!

ह्या देशातला आगामी संघर्ष भाकरी विरुद्ध पिझ्झा असा नसून भाकरीपासून पिझ्झा पर्यंत पोहोचनारी एक पिढी आणि पूरणपोळी पासून पिझ्झा पर्यंत आधीच पोहोचलेली दूसरी समांतर पिढी ह्यांच्यातला आहे. पूरणपोळी पासून पिझ्झा पर्यंत सहज पोचू शकलेले बहाद्दर संस्कृतीची थूकरट शिट्टी वाजवत भाकरी टू पिझ्झा वाल्यांना शिव्या घालण्याचा राजरोस उपक्रम इथे करतात. भाकरी टू पिझ्झा वाले पण पूरणपोळीवाल्यांची आयभैन काढत मागे न हटण्याचा निर्धार करून शडडू ठोकतात. पुरणपोळी वाले पूरणपोळी किती टेस्टी अन कल्चरल आहे ह्याची खवूट पादरी धून वाजवतात. इतकंच नाही तर समग्र पिझ्झाखाऊ समाजच कशी देशाची गांड मारतोय ह्याचे नैतिक लसिकरण करू पाहतात आणि हळूच एखादं चीजबर्स्ट पिझ्झाचं टॉपिंग स्वत: गटकवतात! इथली संस्कृती, परंपरा, अध्यात्म कसं ग्रेट आहे हे तुपाळ भाषेत सांगत पूरणपोळी वाले आधुनिकतेचे सर्व फायदे मस्त एनक्याश करतात. भाकरी टू पिझ्झा प्रवास करणा-याला परंपरेसोबत जगायचे उदात्त ग्यान द्यायचा प्रयत्न करतात. लंगोटीबाज स्वामी बुवाबाबांची यथेच्छ पूजा घालतात. स्वत: मात्र जॉकी घालतात. अर्थात जॉकी घातली म्हणून ह्यांची गुलाबी हिप्पोक्रेट ढुंगणं सुंदर दिसत नाहीत हे चाणाक्ष भाकरी टू पिझ्झावाले ओळखतात. शाब्दिक हानामा-या होतात. शारीरिक हानामा-या होऊ लागल्या की पूरणपोळी खानारे अजूनही भाकरीतच अडकलेल्या बिथरवून भाकरीसाठीच झटना-यातच गुघान दंगे लावून मस्त बाहेरून एन्जॉय करत राहतात. धार्मिक आणि सांस्कृतिक विश्वाच्या नाड्या पूरणपोळीवाल्यांच्या हातात एकवटलेल्या असतात.
कोसलात विद्रोहाचा झुटा मेकअप केलेला पराभूत सांगवीकर भाकरीशी आपलं नातं सांगून पद्धतशीरपणे इथल्या तव्यावर पूरणपोळी भाजतो. चांगदेव मुंबईला फाट्यावर मारून खेड्याकडे चला चा निसर्गरम्य नारा देतो. मिशीवाला बाबा मिशीवर तूप चढवून समृद्ध अडगळी शोधत कावेबाजपने गायब होतो. आमच्यासारखे ज्यांचे बापजादे शतकांच्या घमासान संघर्षातून आताकुठे भाकरीपासून पिझ्झा पर्यंत पोहोचलेत किंवा कमीतकमी ज्यांनी आपल्या पोराबाळांना भाकरीची याद देवून डायरेक्ट पिझ्झाच खाऊ घातलाय अशी नवीन पिढी ह्या पूरणपोळी टू पिझ्झा वाल्यांची खरी दुश्मन आहे. संघर्षाचा प्रश्न जसजसा अधिकाधिक तीव्र भड़क होत जाईल तसतसं ह्या पिझ्झाचं चीज वितळत जाऊन भाकरी विरुद्ध पूरणपोळी ही नागडी फाईट ठळक होत जाईल. तूप गुळवणी पूरण ह्यांची भाकरीच्या दान्यासमोर धूळधान उड़ेल. आम्ही फ़क्त आपलं मूळ न विसरणं महत्त्वाचं आहे. शेवटी गुड़ ऑर ब्याड पण आमच्या पिढीचं अंतिम सत्य निव्वळ पिझ्झाच आहे!

Comments

Popular posts from this blog

नामदेव ढसाळ : विद्रोहाचे भाषेचे करुणेचे मूर्तीमंत प्रतिरूप!

स्ट्रॉबेरी