मित्र आणि साहेब.
आमचा एक साहेब मित्र होता. म्हणजे आधी मित्र होता नंतर साहेब झाला. आता साहेब आहे पण मित्र नाही. त्याला मित्र समजण्यात माझी कसलीच सोय नव्हती. सोय आणि मैत्री एकत्र नांदू शकत नाहीत. बरं माझी न त्याची ब्र्यांचपण वेगवेगळी असल्यानं एकत्र बसून अभ्यासानं फाटलेल्या एकमेक्काच्या टी-या शिवायचा उसवायचा पण काही संबंध नव्हता. ह्याचा येकमेव आधार म्हणजे सिओईपी हॉस्टेलाच्या उंचच उंच भिंतीवरुन रात्री दोनतिनला उड्या टाकून, शिवाजीनगरच्या ष्टयान्डवर चहा क्रीमरोल पोहे आन गप्पा मारायला जाताना हा सगळ्या दोस्तांना पलिकडं उतरायला मदत करायचा. स्वत: नव्वद किलोचा सांड असल्यानं त्याच्या पाशवी ढुंगनाला टिरीखालून जोर देवून त्याला आधी वर चढ़वनं लै मुश्किल काम. शिवाय हा कधी ठस्सदिशी पादेल ह्याचा काय भरोसा नाही. मग मित्र आमच्या टी-यांना जोर देवून सगळ्यांना वर चढवून नंतर सर्वात शेवटी खाली उतरायचा. हे म्हणजे गांडदोस्त असल्याचं फिलिंगच जणू. मग आम्ही ष्टयांडवरच्या उपहारगृहात मुतु येस्तोवर पपा-या मारायला चालू. आरक्षण, गांधी, वोल्गा ते गंगा, बांग्लादेशी दलित मुस्लिम हिंदू, आरएसएस, बिपाशा मल्लिका सोनया, हेडगेवार ह्यारी...