मेणाची माणसं

मेणाची माणसं वितळत जातात मेणाच्याच मेणबत्त्यांसारखी.
सिमिट्रिक सुरक्षित जगलेल्या आयुष्याचा टीचभर ओघळ
अस्ताव्यस्त पसरवत जातात.
मेणाची माणसं मोर्चेही काढतात मेणबत्त्यांचाच.
एका झापेत वा-याच्या सपकन विझूनहि जातात.
मेणाची माणसं चेतवू शकत नाहीत छ्टाक्भर प्रकाशही.
त्यांच्यातल्या वाती केव्हाच्याच मोडलेल्या असतात.
फारफारतर मेणाची माणसं जमंल तसं चिकटून राहतात एकाचजागी.
कोणीतरी बुड उचकटे पर्यंत गपगुमान पिघळत राहतात
आपल्याच सोयीस्कर स्थितप्रद्न्य  मध्यमवर्गीय चिरंतन कोषात.

Comments

Popular posts from this blog

मित्र आणि साहेब.

स्ट्रॉबेरी

बाप आजकाल जास्त बोलत नाही