आठवण

ही भरदुपारची आठववेळ...
कोणत्यातरी अमलताशला खुपावी
नितांत पिवळ्याधमक फुलांची रास

तश्या तुझ्या आठवणी
माझ्या मीभर पसरलेल्या.

आताशा मी उन्हाकडे
तक्रार करत नाही कसलीच,
जळणार्‍या भोवतालात माझं हे असं
एकटयाचं लाहीलाही उमलून फुलणं...
पानगळीला पोरकं होणं!
मी फक्त वाट पाहत राहतो
आतून आतून आतून खचण्याची.
तू मला एकदातरी वेचण्याची.

Comments

Popular posts from this blog

मित्र आणि साहेब.

स्ट्रॉबेरी

बाप आजकाल जास्त बोलत नाही