निःपक्ष
वेळ लागतो जोखायला पाऊस,
त्याची एकेक सर..त्याचा एकेक थेंब..
जोडू म्हणता म्हणता
काळाचा तडा गेलेला आरसा
त्याची एकेक सर..त्याचा एकेक थेंब..
जोडू म्हणता म्हणता
काळाचा तडा गेलेला आरसा
होत नाही पुन्हा नव्याने पूर्ववत...
पायांखालची जमीन सांधता सांधता
दुभंगतो चेहरामोहरा नखशिखांत!
नुसत्या क्लिकवर स्वॅप करता येत नाही
पायांखालची जमीन सांधता सांधता
दुभंगतो चेहरामोहरा नखशिखांत!
नुसत्या क्लिकवर स्वॅप करता येत नाही
कल्पना आणि वास्तव...
कंटाळा येतो सगळ्याच शब्दांचा,
कविता रेटण्याचा,
फूल, पाणी, चंद्र, नदी, मी, तू ...
'अ' 'अ' 'आई'चा गिरवता गिरवता
मशिन्सच्या लगद्यात कुठे हरवून जातात
कंटाळा येतो सगळ्याच शब्दांचा,
कविता रेटण्याचा,
फूल, पाणी, चंद्र, नदी, मी, तू ...
'अ' 'अ' 'आई'चा गिरवता गिरवता
मशिन्सच्या लगद्यात कुठे हरवून जातात
जगण्यातील निरागस निःपक्ष अक्षरं?
Comments