भारतीय राष्ट्रवादाचा पराभव

लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रवादी शक्तींचा अभूतपूर्व पराभव झाला. धक्का फार मोठा आहे.

धक्का फक्त या पराभवाचा नाही. मूळ विश्वास, आस्था आणि श्रद्धांचा आहे. आम्ही ज्या गोष्टींवर मनापासून श्रद्धा ठेवतो, ज्या काही गोष्टी आमच्या जीवनातील मूलभूत सत्ये आहेत, मातृभूमिचे एक राष्ट्र हे स्वरुप आम्ही मनी बाळगतो, ते सर्व खरोखरीच अस्तित्वात आहे का? त्याला वास्तवामध्ये काही आधार आहे का? का ते सर्व फक्त आमच्या स्वप्नसृष्टितच आहे, आमच्या पुरतेच सत्य आहे ? Do our beliefs have any relevance?

मुळापासून विचार करावा लागेल.

RSS आणि संघ परिवार हे काही सर्वगुणसम्पन्न मर्यादा पुरुषोत्तमांचे समूह नाहीत. कलियुगात कोणीच तसे नाही. पण आमच्या बहुदा कल्पनाविश्वातच असलेल्या राष्ट्रीय सत्वाचे - वास्तवात असणा-या शक्तिंमध्ये - सर्वात जवळचे असे वारसदार आणि संरक्षक नक्कीच आहेत. They are the closest approximation of the national essence of India of our time.

म्हणुन त्यांच्या पराभवाने मन विषण्ण होते.
एक तर हे आहे किंवा आम्ही मानतो ते राष्ट्रीय सत्व नाहीच. कधीच नव्हते. किंवा पूर्वी कधीकाळी असेलही पण आता ते नाही आणि आमच्या सारखे लोक ते समजू किंवा पचवू शकलेले नाहीत.
जगात विचार,राष्ट्रे आणि संस्कृति नाहिशा होत असतात. तो जगाचा नियम आहे. आमची ती वेळ आली आहे का? का आमची वेळ कधिचिच होउन गेलेली आहे, आणि आम्हाला समजलेच नाही?
भारतीय जनता पार्टी सारख्या एका य:कश्चित् समूहाच्या पराभवाने संपेल इतके छोटे ते कधीच नव्हते. यापूर्वीही अनेक पराभव झालेले आहेत. प्रचंड पराभव झालेले आहेत. त्यावेळी ते संपले नाही.
पण हा पराभव त्या अंताचे एक लक्षण आहे का? अशी भीती वाटते.
आशेचे किरण सध्यातरी कुठेही दिसत नाहीत.
कॉंग्रेस आल्याने कदाचित काही चांगल्या गोष्टी घडतील. भौतिक प्रगति काही दिशांमध्ये होइल ही. पण तो एक सर्वस्वी निराळा मुद्दा आहे.
या वेळी आम्ही शाळेत शिकलेली कै.हरिवंशराय बच्चन यांची एक कविता आठवते. आमच्या बालमनावर त्या कवितेचा फार प्रभाव पडला होता.

नीड का निर्माण फिर फिर
नेह का आव्हान फिर फिर
यह उठी आँधी कि नभ में
छा गया सहसा अँधेरा
धूलि धूसर बादलों ने
भूमि को इस भाँती घेरा
रात सा दिन हो गया
फिर रात आई और काली
लग रहा था अब न होगा
इस निशा का फिर सवेरा
रात के उत्पात भय से
भीत जन जन भीत कण कण
किंतु प्राची से उषा की
मोहिनी मुस्कान फिर फिर
नीड का निर्माण फिर फिर
नेह का आव्हान फिर फिर
क्रुद्ध नभ के वज्र दंतों में
उषा है मुसकराती
घोर गर्जनमय गगन के
कंठ में खग पंक्ति गाती
एक चिडिया चोंच में तिनका लिए
जो जा रही है
वह सहज में ही पवन
उनचास को नीचा दिखा रही है
नाश के दुःख से कभी
दबता नहीं निर्माण का सुख
प्रलय की निस्तब्धता में
सृष्टि का नवगान फिर फिर
नीड का निर्माण फिर फिर
नेह का आव्हान फिर फिर॥

Comments

Asha Joglekar said…
सुंदरच आहे कविता खूप दिवसांनी परत वाचायला मिळाली. पण को-या गप्पांनी कांही होत नाही काम करून दाखवावे लागेल. अन् आपसातच एकमेकांची मत खाल्ली तर आणखी काय होईल ?

Popular posts from this blog

मित्र आणि साहेब.

स्ट्रॉबेरी

बाप आजकाल जास्त बोलत नाही