काही चारोळ्या.....

हा चारोळ्यांचा गठ्ठा अनेक मी केलेल्या अनेक रेल्वे आणि बस प्रवासांमध्ये असताना लिहिलेला आहे.

ह्या मधिल कविला आणि कवितेला मी नायक आणि नायिका म्हणणार नाही. कारण असे केले तर ह्या भारतवर्षामधे अर्धी लोकसंख्या नायक नायिकांचीच होऊन जाईल.

(कवि त्याच्या प्रियजनांना आणि हितसंबंधीयांना उद्देशून--)

अहो नजरेत भरली एक छोकरी
पण तिला मोठ्या पगाराची नोकरी
आमची आवड बाजरीची भाकरी
तिला हवी इटालियन क्रोकरी

तिला पाहून वेडा झालो ठार
लिफ्ट द्यायला भाड्याने आणली कार
कानापाशी उडवला तिने बार
पुढे ऐकू येईना काही फार

अहो ऐका कुणीतरी दक्कल
पाजळली सारी आम्ही अक्कल
साऱ्या हिरोंची करून हो नक्कल
पडू लागले आम्हाला आता टक्कल

(कवि "कवितेला" उद्देशून --)

तुम्ही घालू नका आता धाक
मन आहे आमचे सच्चे पाक
आम्ही करतो छान स्वयंपाक
भांडी कपडे ही धुतो एकदम झाक

वर्ज्य आम्हा मद्य चकणा काजू
पण तुम्ही बिलकुल नका लाजू
चहाचीच फक्त आरजू
आम्हीच करू तुम्हालाही पाजू

नका होऊ तुम्ही अशा जहाल
करा थोडी तरी मर्जी बहाल
आम्हीही बांधू तुम्हीही पहाल
तुमच्यासाठी ताजा ताजमहाल......(अपूर्ण)

(सूज्ञ वाचकांना निवेदन - चारोळ्यातील घटना तपशिलाने आमच्या आयुष्यात घडल्या आहेत असा समज कृपया करुन घेऊ नये.)

Comments

Popular posts from this blog

मित्र आणि साहेब.

स्ट्रॉबेरी

बाप आजकाल जास्त बोलत नाही