प्रांतवाद कि राष्ट्रवाद
प्रतिभाताईंच्या उमेदवारीने मराठी माणसापुढे नवीन प्रश्न उभे केले आहेत. प्रांतवाद कि राष्ट्रवाद अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. मराठ्यांच्या राष्ट्रीय कर्तव्याप्रतीच्या भावना आणि योगदान ह्यांनी इतिहासाची पाने पराक्रम, त्याग, बलिदान आणि विजयाने झळाळून टाकली आहेत. सम्राट शालिवाहनाने शक, हूण आणि कुशाणांना पराभूत करून ह्या भूमीला रानटी आक्रमकांपासून मुक्त केले. त्रिसमुद्रतोयपितवाहन ही पदवी सातवाहन राजांनी सिद्ध केली. छत्रपति शिवाजी महाराजांनी मोगलांना पाणी पाजून पराक्रमाची परिसीमा केली आणि राष्ट्रीय स्वाभिमानाची पुनर्स्थापना केली. येथील समाजसुधारकांनी देशाला प्रगतीची नवी दिशा दाखवली. असे असताना एक मराठी माणूस देशाच्या सर्वोच्चपदी बसण्याचा आनन्द मराठी लोकान्ना व्हावा आणि त्यान्नी त्यासाठी प्रयत्न करावा ह्यात गैर असे कहीही नाही. हा काही प्रान्तवाद नाही. प्रान्तवाद तो, जो त्या प्रान्तातील लोकान्ना मूळ राष्ट्रीय प्रवाहापासुन दूर नेण्याचा प्रयत्न करतो, फुटीरतेची आणि वेगळेपणाची भाषा करतो. अशा प्रव्रुत्तीला क्रूरपणे आणि निर्घ्रुणपणे ठेचले पाहीजे.
ह्या निमित्ताने मराठी कोण हा प्रश्न ही उभा राहीला आहे. आता प्रतिभाताईंचे पूर्वज महाराष्ट्रात कधी आले, कोठून आले आणि त्यांची मूळची भाषा कोणती हे सर्व प्रश्न मूर्खपणाचे आणि खोडसाळ आहेत. कोणताही भारतीय, ज्याला मराठी येते आणि मराठी भाषा आणि संस्क्रुती बद्दल आपुलकी वाटते तो मराठी माणूस. ते काही वेगळे राष्ट्रीयत्व नाही. ह्या न्यायाने जॉर्ज फर्नांडीस हे बाळासाहेब ठाकरेंच्या इतकेच मराठी आहेत. पण मराठी म्हणून आपण कोणालाही पाठींबा द्यायचा का? त्यापुढे राष्ट्रहिताशी तडजोड करायची का? ती व्यक्ती मराठी म्हणून, की आणखी कोणत्या निकषांवर निवडली जात आहे, हे तपासून पहायला नको का? हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या प्रतिष्ठेसाठी.
ह्या प्रश्नांचे सरळ उत्तर आहे , नाही , आम्ही मराठी म्हणून राष्ट्रहिताशी कधीही तडजोड करणार नाही. अमुक एका व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या प्रती असलेल्या निष्ठेपायी , हितसंबंध जपण्यासाठी जर एक मराठी व्यक्तीची उच्चपदी नेमणूक होत असेल तर त्यात मराठी असण्यापेक्षा वरील गुणांचा(??) जास्त विचार झालेला असण्याच्या संभव आहे. मराठी माणसाच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर कोणी स्वतःचे नेम साधू इच्छीत असेल तर ती आमच्या दृष्टीने लाजीरवाणी गोष्ट आहे.

Comments