'एकादशीच्या घरी शिवरात्र'
जसवतसिंगांची हकालपट्टी झालीच शेवटी. हे तसे तर फार आधीपासूनच ठरले होते. लोकसभा निवडणूकीतल्या मानहानीजनक पराभवानंतर बहुतांश भाजप नेत्यांचे डोके फिरल्यागतच झाले होते. जसवंतसिंगानीही त्याच न्यायाने वागत जराश्या वेगळ्या पद्धतीने त्यावर शिक्कामोर्तब केले इतकेच. तसे पाहिले तर लोकसभा निवडणूकांनंतर पक्षश्रेष्ठींना पत्रे पाठवून त्यांनी भाजपाच्या चिंतनशीलतेविषयी, पराभवाच्या जबाबदारीविषयी जेव्हा प्रश्ने उपस्थित केली तेव्हाच कमळावरचे भुंगे चिडले. हकालपट्टीच्या निर्णय म्हणजे सगळ्या भुंग्यांनी एका फरफटलेल्या दुस-या भुंग्याला चावा घेतला असेच म्हणावयास हवे! पुस्तकांच्या रूपाने प्रसिद्धी स्वतःकडे खेचून घेणे जसवंतसिंघांना काही नवीन नाही. ए कॉल टू हॉनरःइन सर्विस ऑफ इमर्जंट इंडिया ह्या पुस्तकातही त्यांनी वादग्रस्त विधाने खळबळ उडवून दिलीच होती. हातात सत्ता नसली म्हणजे लेखणी सुद्धा फरफटते हयाचेच हे द्योतक आहे. जिना आणि फाळणीचा चघळून चघळूनही न संपलेला प्रश्न पुन्हा उपस्थित करून जसवंतसिंघांनी नेमके काय साधले कुणास ठावूक? त्यांच्या ह्या असल्या आशाळभूत वर्तनावर ताशेरे ओढणे साहजिकच होते. पण एक बाब इथे लक्षात घ्य...