Posts

Showing posts from February, 2019

काँग्रेस ची संवैधानिक बांधिलकी!

शहाबानो प्रकरणात ढीगभर माती खाण्याचा इतिहास असणाऱ्या काँग्रेस ने ओवेसी ची संवैधानिक बांधिलकी मोजण्याचा अट्टाहास करणे हे मोदीने 'नेहमी खरे बोलावे' असा सुविचार भर सभेत सांगण्याइतकेच ढोंगी आणि दांभिक आहे. संविधानाचा मान सन्मान आणि अभ्यास असणारा बॅरिस्टर ओवेसी इतका दुसरा कुणी क्वचितच असेल ह्या देशात. आम्ही राजकारण करू तेव्हा ते एकदम पवित्र आणि तुम्ही कराल ते मात्र अनहायजेनिक असला गुत्तेबाज माज काही कामाचा नाही. तो समूळ नष्ट झाला पाहिजे. तशीही काँग्रेस ची मजल एखाद दुसरी संविधान बचाव रॅली काढण्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. काँग्रेस संविधानाशी एकनिष्ठ राहिली असती तर देशात मोदी जन्माला आला नसता. पण काँग्रेसचा 'आम्हीच संविधान रक्षणकर्ते' वगैरे आविर्भाव म्हणजे एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी डॉक्टर साहेब सुट्टीवर आहेत म्हणून जसा त्याचा फावल्या वेळात गुत्त्यावर सदोदित पडीक कंपाउंडर पेशंटला 'कशाला काळजी करता वं आप्पा, मी हाय ना. हि घ्या गोळी तीन टाइम. गोळी घशात आजार बोच्यात' असा दुर्दम्य आत्मविश्वासाची झूल पांघरून विश्वास आणि दिलासा देणारा तोतया वैदू आहे. तात्पर्य : आप्पाने आता...

नामदेव ढसाळ : विद्रोहाचे भाषेचे करुणेचे मूर्तीमंत प्रतिरूप!

नामदेव ढसाळ हे व्यक्तिमत्व निवळ साहित्यिक, महाकवी, राजकारणी एवढेच मर्यादीत नसून नामदेव ढसाळ हे नाव हजारो वर्षे इथल्या धर्माने, जातीने, कर्मकांडाने माणुसकिच्या गावकुसाबाहेर निरंतर सडवत ठेवलेल्या हजारो पिढ्यांचा अजरामर बंडखोर भाष्यकार आहे. हिंदू वर्णव्यवस्थेने समाजाच्या ज्या मोठ्या समूहाला जनावरांचेही नैसर्गिक जगणे शेवटच्या माणसासाठी थोर ठरावे इतक्या अमानुष तर्‍हेने समाजाच्या सर्व क्षेत्रातून कायम नासवले, अस्पृश्य माणसाचे जगणे आणि मरणेही टाचा घासून तडफड करत जीव सोडणार्‍या एखाद्या प्राण्याच्या अवस्थेहून बत्तर केले गेले, नामदेव ढसाळ हा त्या तमाम गावकूसाबाहेर फेकल्या गेलेल्या घटकांचा लढवय्या भाष्यकार आणि सार्वकालिक इतिहासकार आहे. फॅन्ड्री मधल्या जब्याने ज्या ताकदीने आणि त्वेषाने दगड भिरकावला त्याच ताकदीने ढसाळांच्या प्रत्येक शब्दांचा अंगार माणुसकीला मोताद झालेल्या ह्या गावावर जळजळीतपणे कोसळत राहिला, इथल्या व्यवस्थेच्या तंटबंदीला मूळापासून उखडून उध्वस्त करत राहिला आणि अंतिमत: ‘माणसाचेच गाणे माणसाने गावे’ ह्या ओळी गुणगुणत नामदेव ढसाळांचे शब्द माणुसकीचे, सम्यकतेचे आकाश विस्तारत राहिले. ढसाळ...