नाव नसलेले काही लेख - २.
तसं पाहिलं तर आताशा आपण जे कायपण लिहित असतो ते आल्मोस्ट कुणी घंटा वाचत नाही. तरीही हि लिहिण्याची अगम्य खाज का काय कायमची शमत नाही. अधूनमधून उफाळोन येतेच. थाड थाड करत क्यालेंडरचि पानं उडत जातात. वयाचं नामोनिशान अजून दिसत नसलं तरी आपण झिजत असतोच प्रत्येक क्षणाला. कुणाला ते झिजणं मनासारखं वाटतं. तर कुणाला आपण झिजतोय ह्याची काहीच लेणदेण नसते. तर कुणी आपल्यासारखे चुतिये आपण का, कशासाठी झिजतोय ह्याचं विच्छेदन करण्यात अक्षरांची होळी पेटवतात... कोण्या एका भुक्कड संध्याकाळी आत्ममग्न होत पाहिलेली स्वप्ने - उदाहरणार्थ चळवळ, लेखन, राजकारण, प्रशासन, इतिहास, कविता इत्यादी इत्यादी फालतू शब्दबंबाळ जांगडगुत्ता नुसता… ह्याच्यापासून आपण मैलो दूर आलोय आता. प्राथमिकता बदलून गेल्यात. किंबहुना ज्या गोष्टी येडझव्या बुर्झ्वा वाटायच्या त्याच गोष्टीत जगण्याची प्राधान्यक्रमता ठरू लागलीय. शेवटी आपणही ग्लोबलायझ होता होता येड्यात निघालो च्यामायला. किंवा असंही असू शकतं कि भुक्कड संध्याकाळी पाहिलेली स्वप्ने खरोखरच बिनडोक होती. हिरोइझम का फ्यांटसिझम चा नाद होता बहुतेक. जवळपास ते सगळं संपल्या सारखं वाटू लाग...