नाव नसलेले काही लेख - १
मी अत्यंत भिकारचोट झालो आहे असे मला आजकाल वाटू लागले आहे. म्हणजे बक्कळ पैसे ब्यांकेत आणि खिशात असूनही मी डेंजर भिकारी झालोय असं वाटतंय. हे भिकारपण बहुतेक आर्थिक सोडून बाकी सगळ्या ज्ञात अज्ञात प्रकारचं असावं. सामाजिक, मानसिक, शारीरिक, नैतिक, तार्किक, बौद्धिक, पारंपारिक, लौकिक, वैचारिक आणि काय काय कुणास ठावूक! कित्येक - "इक" शब्दांत असणा-या व्याख्यांचं हे भिकारपण माझ्यापाशी गेल्या चारेक वर्षात बक्कळ जमा झालंय. पैसे सोडून बाकी काहीच आपले जवळचे "नसण्याची" ही जीवघेणी श्रीमंती मला चिक्कार वेळेस नकोनकोशी वाटते. आणि खोटं कशाला बोला - ब-याच वेळेस हवीहवीशी देखील वाटते. मनामध्ये सतत उल्टेपालटे विचार येतात. म्हणजे काहिच्याकाहि. उदाहरणार्थ - आत्ता ह्या क्षणाला मी मेलो तर काय होईल? कुणाला आणि किती काय फरक पडेल? मी लांबलेल्या, आधी असलेल्या आणि आता नसलेल्या आणि त्यातल्या त्यात आता जवळ असणा-या मित्रांना शेवटी काय बोलेन. फेसबुक वापरेन कि whatsapp वापरेन. मी कितीही सिरीयस होऊन आपले शेवटचे मनोगत त्यांना व्यक्त केले तर ते नुसता "हम्म" असा हरामखोर ...