Posts

Showing posts from July, 2008

बुद्धाचे स्मितहास्य - भारत अमेरिका आण्विक करार

भारत पुनर्निर्माण दलाच्या "विजयी युवक" नावाच्या मासिकामध्ये मी हा लेख लिहिला होता. ------ बुद्धाचे स्मितहास्य - भारत अमेरिका आण्विक करार भारताने १९७४ मध्ये पहिली अणुचाचणी केली आणि बुद्धाला पहिल्यान्दा हसू फुटले. अहिन्सेच्या एका श्रेष्ठ पण एकतर्फी अशा बन्धनातून काहीसा मोकळा श्वास आपण घेतला. १९९८ मध्ये आणखी शक्तीशाली स्फोट करून आपण जगाला मोठा धक्का दिला. त्यानन्तर चरफडलेल्या पाश्चात्य जगाने निर्बन्ध घालून आमच्यावर लगाम कसायचा प्रयत्न केला. त्याला आम्ही स्वदेशीचे पुनरुज्जीवन करून उत्तर दिले. अमेरिकाविरोधी भावना उत्तेजीत झाल्या होत्या आणि त्यात टूथपेस्ट पासून शीतपेयान्पर्यन्त सर्व अमेरिकन गोष्टीन्वर बहिष्कार पडायची वेळ आली होती. जग त्यानन्तर खूप बदलले आहे. इतके कि जो रस्त्यावर चालणारा माणूस, ज्याला दिल्ली, इस्लामाबाद,मॉस्को,वॉशिन्ग्टन मध्ये काय चालले आहे याचे सोयरसुतक ठेवण्याची गरज भासत नसे, त्याला ह्या सर्व गोष्टीन्ची दखल घ्यावी लागत आहे.त्याची मुले आय.टी. चे कोर्स करण्यासाठी पैसे मागू लागली आहेत, त्याचे शेजारी मॉल मध्ये खरेदी करत आहेत आणि त्याला मुम्बई,दिल्ली, हैदराबाद सारख्या ...