प्रांतवाद कि राष्ट्रवाद
प्रतिभाताईंच्या उमेदवारीने मराठी माणसापुढे नवीन प्रश्न उभे केले आहेत. प्रांतवाद कि राष्ट्रवाद अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. मराठ्यांच्या राष्ट्रीय कर्तव्याप्रतीच्या भावना आणि योगदान ह्यांनी इतिहासाची पाने पराक्रम, त्याग, बलिदान आणि विजयाने झळाळून टाकली आहेत. सम्राट शालिवाहनाने शक, हूण आणि कुशाणांना पराभूत करून ह्या भूमीला रानटी आक्रमकांपासून मुक्त केले. त्रिसमुद्रतोयपितवाहन ही पदवी सातवाहन राजांनी सिद्ध केली. छत्रपति शिवाजी महाराजांनी मोगलांना पाणी पाजून पराक्रमाची परिसीमा केली आणि राष्ट्रीय स्वाभिमानाची पुनर्स्थापना केली. येथील समाजसुधारकांनी देशाला प्रगतीची नवी दिशा दाखवली. असे असताना एक मराठी माणूस देशाच्या सर्वोच्चपदी बसण्याचा आनन्द मराठी लोकान्ना व्हावा आणि त्यान्नी त्यासाठी प्रयत्न करावा ह्यात गैर असे कहीही नाही. हा काही प्रान्तवाद नाही. प्रान्तवाद तो, जो त्या प्रान्तातील लोकान्ना मूळ राष्ट्रीय प्रवाहापासुन दूर नेण्याचा प्रयत्न करतो, फुटीरतेची आणि वेगळेपणाची भाषा करतो. अशा प्रव्रुत्तीला क्रूरपणे आणि निर्घ्रुणपणे ठेचले पाहीजे. ह्या निमित्ताने मराठी कोण हा प्रश्न ही उभा राहीला आहे. ...