नाव नसलेले काही लेख - १. ५
आयुष्यातील गेली तीनेक वर्षे मानसिक दृष्ट्या फारच अस्वस्थ, ओढाताणीची, अजीर्ण जावू लागली आहेत. मनात प्रचंड खदखद साचू लागली आहे. नेमकं काय होतंय हे सांगण्याच्या पलीकडे गेल्यासारखं वाटू लागलंय. शब्दांची कधी नव्हे ते कमतरता भासू लागली आहे. सगळा खटाटोप अनाकलनीय वाटू लागला आहे. एका झटक्यात सगळी भेंचोत नाती तोडून द्यावीत आणि लांब कुठे तरी निघून जावे असे वाटू लागले आहे. ब-याच वेळेस आपल्या सर्वांगाची वाफ झाली तर किती बरे होईल असे वाटू लागलेय. पुस्तकं वाचायला घेतली तर चारेक पानं वाचूनच गरगरायल्या सारखं होतं आजकाल. ज्या लोकांना "हरामखोर" हि पदवी लावून मेंदूतून format केलं तीच लोकं व्हायरस सारखी मनात कचकचून आठवू लागतायत. काही लोकांनीही आपल्याला त्यांच्या आयुष्यातून अक्षरश: format केलं, हाकलवून दिलं नकळत अलगद … त्यांनाही आपण असेच पछाडत असू का? कि ही माझीच स्वयंभू खाज आहे परत परत तेच तेच चेहरे आठवण्याची? असे एक ना हजार फालतू छिनाल प्रश्नं… रिकाम्या धरणासारखे, वळवळना-या गांडूळा सारखे, पालीच्या तुटलेल्या शेपटी सारखे, काय काय अन काय काय!!! जे काही वाटतंय ते व्यवस्थित शब्दांत सुद्धा सा...