बाज
धूळभरल्या अक्षरांची पापणी उघडली जाते असह्य पोरकेपणाने... आणि सरकत जातो डोळाभर रस्त्यावरून तुझ्या आठवणींचा बेहद्द लमाण तांडा. मी तुला रूतेनच निमुळत्या पायांच्या फिक्या चंद्ररंगी जोडव्यातून, मी तुझ्यात विखरेनच अंगोपांगी आरश्यातून स्पर्शाळत्या प्रतिबिंबातून. तू फक्त कविता हो माझ्या अक्षरांपलिकडची दुःखाचा लमाणी बाज पांघरून.