Sunday, August 10, 2008

पाढा

आईवडीलभाऊबहीणमित्रमैत्रिणीकलिग्जबॉस
हे तर अपरीहार्यच
त्याशिवायही
माझ्यात आणि जगात अंतर राहू नये
म्हणून सकाळी दार खटखटवणारा पेपरबॉय
किराणा मालाच्या दुकानातील मारवाडी
माझी किंवा माझ्यांमुळे गोची होऊ नये
वाहतूकीची म्हणून ट्रॅफिक पोलीस
इत्यादी इत्यादी सगळेजण ज्ञात आणि अज्ञात...
ह्यांना वजा करून जो काही उरतो मी
तो म्हणजे शून्याच्या आसपास
डेसिमल्सच्या अनंत चेनसारखा
पूर्णत्वासाठी झगडणारा...
एक छाटछूट अवशेष...
ज्याला तुम्ही 'आयुष्य' म्हणता
आणि ते मी ही जगून घेतो
शून्याचा पाढा म्हणत वारंवार!!!

1 comments:

Veda said...

shunya...baryaach diwasaani chaangali kavita vaachali!:-)