Thursday, July 10, 2008

बघता बघता विझले डोळे

बघता बघता विझले डोळे
हसता हसता भिजले डोळे

आठवणींचे वादळ आले
एकाएकी थिजले डोळे

दु:खाला मी तासत गेलो
माझ्या नकळत झिजले डोळे

ह्या अश्रुंचे आधण झाले
आयुष्याचे शिजले डोळे

स्व्प्नांचा हा जागरगोंधळ
नाही माझे निजले डोळे

— मयूर

0 comments: